वडोदा पोलिसांची धडक कारवाई: ८० हजारांच्या मोटारपंप चोरीचा पर्दाफाश, ४ आरोपी गजाआड!

वडोदा पोलिसांची धडक कारवाई: ८० हजारांच्या मोटारपंप चोरीचा पर्दाफाश, ४ आरोपी गजाआड!

मौदा/- :

इंडस्ट्रियल कंपनीचा दरवाजा तोडून इलेक्ट्रिक मोटारपंप चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळी गँगचा वडोदा पोलिसांनी अत्यंत शिताफीने पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ४ सराईत आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ८०,००० रुपये किमतीचे ४ नग इलेक्ट्रिक मोटारपंप जप्त केले आहेत.कंपनी फोडून केली होती चोरीमिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी वडोदा येथील सारडा इंडस्ट्रियल कंपनीचा मागील दरवाजा तोडून अज्ञात चोरांनी मशीनरीला लागलेले ४ महागडे मोटारपंप चोरून नेले होते. याप्रकरणी वडोदा पोलीस ठाण्यात गुन्हा (क्र. ३०८/२६, कलम ३०५(५), ३३१(३), ३३१(४) बीएनएस) दाखल करण्यात आला होता.कढोली शिवारात रचला सापळा!गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तपास चक्र गतीमान करण्यात आली. चोरलेले मोटारपंप विक्रीसाठी कढोली शिवारातील एका कबाडीच्या दुकानात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कढोली शिवारात सापळा रचून ४ संशयितांना ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेले आरोपी:१) मोहम्मद इम्तियाज उर्फ अमजद मोहम्मद राजा खान (वय ३६, रा. शिवाजी चौक, वडोदा)२) विशाल सुनील ठोकर (वय २८, रा. शहीद चौक, वडोदा)३) प्रदीप भाऊराव मते (वय २८, रा. वडोदा)४) तुषार महादेव बुचके (वय २३, रा. वडोदा)पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी पंचांसमक्ष सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.या ‘झांबाज’ पथकाने केली कारवाई:ही यशस्वी आणि कौतुकास्पद कामगिरी नागपूर ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. हर्ष ए. पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अनिल म्हस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शशांत एन. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली वडोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. मनोज गदादे यांच्या नेतृत्वात हवालदार प्रणय बनाफर, पोलीस शिपाई अतुल निंबार्ते आणि पोलीस शिपाई ईश्वरकर यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरात चोरांचे धाबे दणाणले आहेत.

नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *