सावळदबारा येथे शालिवस्तादबाबा व नागोबा यात्रा उत्सव उत्साहात संपन्न;
….
जंगी कुस्त्यांनी वेधले कुस्तीशौकिनांचे लक्ष!
…
सोयगाव तालुका..
प्रतिनिधी संतोष गर्दे..
…..
सोयगाव सावळदबारा : धार्मिक सलोखा, सामाजिक एकोपा आणि पारंपरिक कुस्तीचा वारसा जपत सावळदबारा येथे शालिवस्तादबाबा व नागोबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या गावातील कुस्ती कमिटीच्या वतीने आयोजित जंगी कुस्ती स्पर्धेने उपस्थितांची मने जिंकली.
या कुस्ती स्पर्धेत विविध गावांतील नामांकित पैलवानांनी सहभाग घेत आपल्या कुस्ती कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. पैलवानांच्या अटीतटीच्या लढती, चित्तथरारक डावपेच आणि ताकदीच्या जोरावर झालेल्या कुस्त्यांना उपस्थित कुस्तीशौकिनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कुस्तीचा थरार अनुभवण्यासाठी गावासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.यात्रा उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी फर्दापूर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या जंगी कुस्ती स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील माजी सरपंच लुखमानसेठ, डॉ. पांडे, पंजाबराव देशमुख, माजी जिल्हा प. स. शिवाजी बुढाळ, प्रा. जीवन कोलते सर, डॉ. जफर सय्यद, डॉ. विठ्ठल कोते, वसंत चोरमाले, ईश्वर कोळपे, किसन सूर्यवंशी, सुधाकर शिप्पलकर, देवाप्पा पंधाडे, म.फिरोज, प्रमोद काळे, शिवाआप्पा चोपडे, गणेश खैरे, पंजाबराव सर आदींनी पुढाकार घेतला.एकूणच, धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकात्मता आणि कुस्तीच्या पारंपरिक संस्कृतीचा सुंदर संगम घडवणारा सावळदबारा येथील बाबा व नागोबा यात्रा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
