*सावनेर येथे संविधान दिना निमित्त सामुहिक बुध्द वंदनेचे आयोजन*
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी युवक जागृती मंडळाचे वतीने
सावनेर बसस्थानका जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णा कृती पुतळा येथे संविधान दिनाच्या पावण पर्वा निमित्त
दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता
भाजप नेते रामराव मोवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची पुजा अर्चना माल्यार्पणा नंतर सामुहिक बुध्द वंदना घेण्यात आली यावेळी शिलरक्षीत महाथेरो
भाजप जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, माजी नगराध्यक्ष अँड अरविंद लोधी शिवसेना उध्दव ठाकरे गट नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष उत्तमराव कापसे, सभापती बाबाराव पाटील सर अँड अरविंद लोधी, युवक जागृती मंडळाचे अध्यक्ष सुधाकर बागडे,गटाचे नेते संजय काळमेघ प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी संविधान दिनाचा विजय असो ,जबतक सुरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा अशी घोषवाक्य देण्यात आली कार्यक्रमाचे समापण मिठाई वाटपाने करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जनविस होमेश्वर डोंगरे, संचालन परमानंद मानवटकर तर आभारप्रदर्शन मंडळाचे सचिव विक्की शेंडे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सागर मेश्राम, राजेश बडखाने,सोनु गव्हाणे, स्तुप बागडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
तालुका प्रतिनिधी अनुप पठाने सावनेर
