पवित्र रमजान महिन्यात दोन चिमुकल्या जुळ्या भावांनी वयाच्या चौथ्या वर्षी प्रथम रोजा ठेवून केला पूर्ण
यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर
मुस्लिम समाजात पवित्र
मानला जाणारा रमजान महिना या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा ठेवून अल्ला कडे दुवा मागतात याच पवित्र रमजान महिन्यात महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) येथील भुसार व्यापारी शेफी सेठ यांचे नातू हसन रियाज सुरैया व हुसेन रियाज सुरैया यानि वयाच्या चौथ्या वर्षी रमजान महिन्याच्या 23 व्या रोजा ला त्यांनी स्वतःच्या जीवनातील पहिला रोजा धरून त्यांनी तो पार केला.
हिवरा (संगम)गावातील सर्व मुस्लिम बांधवानी कौतुकाचा वर्षाव केल्या
इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सुरवात १९ फेब्रुवारी ला झाली असून आज उपवासाचा (रोजा) २३दिवस आहे. रोजाची सुरुवात इस्लामिक कॅलेंडरमधील रमजान हा नववा महिना असून, हा महिना २९ किंवा ३० दिवसांचा असतो. दररोज पहाटे (सूर्योदयापूर्वी) ‘सहरी’ करून रोजा सुरू होतो आणि संध्याकाळी (सूर्यास्तानंतर) ‘इफ्तार’ करून रोजा सोडला जातो रोजा म्हणजे केवळ उपाशी राहणे नव्हे, तर वाईट पाहणे, वाईट ऐकणे आणि वाईट बोलण्यापासून दूर राहून स्वतःवर ताबा मिळवणे होय. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत अन्न आणि पाणी न घेता रोजा पाळला जातो.हिवरा भुसार मार्केटचे व्यापारी शेफी शेठ यांचे नातू हसन रियाज सुरैया व हुशेन रियाज सुरैया या चिमुकल्या मुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे..
