19 ऑगस्ट जागतिक फोटोग्राफर दिवस अति जल्लोषात साजरा…
वाकोद प्रतिनिधी… दीपक गायकवाड….
दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिन साजरा केला जातो. यंदाच्या 2026 च्या जागतिक छायाचित्र दिनाची फोटो एक आठवण या भावनेशी जोडलेल्या आठवणी, माणसं, संस्कृती आणि रोजच्या आयुष्यातील खास क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा संदेश दिला जात आहे.आज सोशल मीडिया आणि स्मार्टफोनमुळे छायाचित्रण सर्वसामान्यांच्या हातात पोहोचले आहे. फोटो काढण्यासाठी आता महागडा कॅमेरा किंवा विशेष प्रशिक्षण असणे आवश्यक नाही. मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण टिपू शकतो.
फोटो म्हणजे फक्त फोटो नाही!
छायाचित्रांचे महत्त्व केवळ आठवणी जपण्यापुरते मर्यादित नाही. इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटना, सामाजिक प्रश्न, पर्यावरणीय समस्या आणि मानवी परिस्थिती जगासमोर आणण्यात छायाचित्रांनी मोठी भूमिका बजावली आहे.
एखादा फोटो हजारो शब्दांपेक्षा प्रभावी ठरू शकतो. तो एखाद्या व्यक्तीची, ठिकाणाची किंवा घटनेची आठवण भविष्यातही जिवंत ठेवू शकतो.
तर माणसं, आठवणी, संस्कृती आणि आपलेपणाची भावना आहे. त्यामुळे या जागतिकछायाचित्र दिनी आपल्या आयुष्यातील एखादा खास क्षण कॅमेऱ्यात टिपा आणि त्या आठवणी जपून ठेवा.
यासाठी एकता फोटोग्राफर ग्रुप शेंदुर्णी वाकोद पहुर सोयगाव. तसेच परिसरातील सर्व लहान मोठे गावे सर्व फोटोग्राफर एकत्र येऊन रुद्रेश्वर महादेव मंदिर यांच्या साक्षीने निसर्गरम्य सहल व जेवणाचा निसर्गरम्य आस्वाद घेत मन एकत्र जुळतील असे विचार व फोटोग्राफी
आठवणीचा संदेश देत… कॅमेराचे पूजन करून सर्व आलेल्या मित्रपरिवाराचे स्वागत करून कार्यक्रमाचा समारोप केला… या कार्यक्रमाचे आयोजक.. आदरणीय श्रीकृष्ण चौधरी सर… राहुल बारी.. मनोज कुमावत… व शेंदुर्णीतील सर्व फोटोग्राफर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.. आलेल्या सर्व फोटोग्राफर बंधूंनी त्यांचे आभार मानले…
