शांतता, शिस्त आणि नियमांचे पालन करून ‘गणेश उत्सव २०२६’ साजरा करा; तुमसर पोलिसांचे आवाहन
तुमसर -:भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. नूरुल हसन सा. (IPS) आणि तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी ‘श्री गणेश उत्सव २०२६’ च्या पार्श्वभूमीवर विशेष नियमावली व मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक शांतता, पर्यावरण पूरक सण आणि सुरक्षेला प्राधान्य देत हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन तुमसर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.पोलीस प्रशासनाने जाहीर केलेल्या महत्त्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत:१. ध्वनी प्रदूषणमुक्त आणि शांततापूर्ण उत्सव:डी.जे. आणि डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करावा. ध्वनी प्रदूषण टाळून शांततेचे नियम पाळावेत.धार्मिक व राजकीय सलोखा राखून उत्सव शांततेत व सौहार्दाने साजरा करावा. फटाके फोडणे टाळावे.२. पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि विसर्जन:मातीच्या मूर्तींची स्थापना करावी. प्लास्टिक व थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळावा.जलस्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ नियोजित स्थळीच श्रींचे विसर्जन करावे.३. ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना:सार्वजनिक उत्सवात एकता टिकवून ठेवण्यासाठी ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेला प्राधान्य द्यावे.प्रत्येक गणेश मंडळाने पोलिसांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे.४. सुरक्षा आणि स्वच्छता व्यवस्था:सुरक्षेची काळजी म्हणून मंडळांनी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.परिसरात स्वच्छता राखावी, कचरा इकडेतिकडे टाकू नये.आपातकालीन संपर्क:उत्सवा दरम्यान कोणत्याही तातडीच्या मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी नागरिकांनी आपातकालीन नंबर ११२ वर त्वरित संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
