*पठाडे महाविद्यालयात शिक्षक दिन व उद्बोधन सत्र संपन्न*
*हिंगोली, प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली दि. ५ सप्टेंबर :* येथील संत श्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उद्बोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य *डॉ. प्रभाकर क-हाळे* हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून *प्रा. विजयकुमार पाईकराव, प्रा. विजयकुमार कांबळे, डॉ. लक्ष्मण सोळंके* व सिने अभिनेत्री *लीना जाधव मॅडम* हे उपस्थित होते.
सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक *प्राध्यापक सुभाष चव्हाण* यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचे समाजातील महत्त्व, शिक्षक-विद्यार्थी नाते तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *प्रा. विक्रम भगत* यांनी केले, तर आभार प्रदर्शन *प्रा. माया जाधव* यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी *डॉ. पी.पी. सोनकांबळे, श्री. अमोल क-हाळे, प्रा. विद्या मोरे, श्री. नानाभाऊ दशरथे* आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
