हिप्परगा थडीत सोंगी भारूडाचा जंगी सामना रंगला

हिप्परगा थडीत सोंगी भारूडाचा जंगी सामना रंगला..!

 

सगरोळी दि.२१(विशेष प्रतिनिधी)

 

सगरोळी पासून जवळच असलेल्या हिप्परगा थडी येथे ग्राम विकास दुर्गा मंडळाच्या वतीने दि.१९ ऑक्टोबर ला आयोजित करण्यात आलेल्या जंगी सोंगी भारूड कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाथ महाराज नंदुरकर आणि भारत पाटील टाकळीकर यांच्यात रंगलेल्या भारूडाच्या जोरदार सादरीकरणाने कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. यावेळी केसगीर महाराज अकर्गेकर यांच्या सोंगी भारूडने कार्यक्रमाची शोभा वाढली.

 

ग्रामीण भागातील पारंपरिक लोककलेचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता यावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी कलाकारांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक शंकर महाराज मठपती पोलीस पाटील हिप्परगा थडी यांनी पुढाकार घेतला. मंडळाचे अध्यक्ष अशोक महाराज, उपाध्यक्ष हणमंत तुकडे, सचिव तसेच पत्रकार राजेश आमेटवार, माणिक तुकडे, भुरे शिवा, अजगरे ईश्वर, भुरे साईनाथ, किरण तंगनोड,शुभम धनुरे,गंगाधर परसुरे, हणमंत अजगरे यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

 

ग्राम विकास दुर्गा मंडळाच्या पुढाकारातून पार पडलेल्या या सोंगी भारूड कार्यक्रमामुळे पंचक्रोशातुन आलेल्या नागरिकांमध्ये उत्साह दिसून आले. पारंपरिक लोककलेचा आनंद घेत नागरिकांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

 

 

चौकट

 

सोंगी भारूडात बक्षीस स्वीकारताना कलाकारांनी हातखुणांच्या माध्यमातून दुसऱ्या कलाकाराला बक्षीस देणाऱ्या प्रेक्षकाचे नाव सांगितले. कोणताही स्पष्ट संवाद न करता केवळ हातवारे आणि खुणांच्या आधारे नाव सांगण्याच्या अनोख्या प्रकाराने नागरिक आश्चर्यचकित झाले.हा अनोखा समन्वय पाहून प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झाले.

सी टी न्यूज इंडिया साठी प्रतिनिधी ॲड.डाॅ.प्रकाश जोशी, सगरोळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *