घोटमुंढरी येथे भक्तिमय वातावरणात लाडक्या दुर्गा मातेला भावपूर्ण निरोप
मौदा:-
घोटमुंढरी येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या लाडक्या दुर्गा माता मूर्तींचे दि. 20 ऑक्टोंबर 2026 मंगळवारी अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात विसर्जन करण्यात आले. ‘दुर्गा माता की जय’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण घोटमुंढरी परिसर दुमदुमून गेला होता.
गेले नऊ दिवस गावामध्ये आदिशक्तीची भक्ती आणि मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करण्यात आला. विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मुख्य चौकातून मंदिरापासून करण्यात आली. या मिरवणुकीत गावातील अबालवृद्ध, महिला आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. अनेक मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करून दुर्गा मातेची पालखी व रथ सजवले होते.
गावातील प्रमुख मार्गांवरून फिरून मिरवणूक विसर्जन स्थळाकडे तलावात मार्गस्थ झाली. व भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले,विसर्जनाच्या वेळी भाविकांचे डोळे पाणावले होते. संपूर्ण विसर्जन सोहळा शांततेत आणि शिस्तीत पार पडावा यासाठी स्थानिक अरोली चे पोलीस निरीक्षक श्री.सागर गोमासे व पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत सरपंच आणि उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी चोख व्यवस्था ठेवली होती.
नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
