उमरखेड पेट्रोल पंपाची लीज रद्द करण्याबाबतची कलेक्टर कडून सुनावणी 30 जानेवारी 2026 रोजी
प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर यवतमाळ
उमरखेड पेट्रोल पंप हटवण्याचा ठराव नगरअध्यक्षा सौ तेजश्री जैन घेणार का
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून नवनिर्वाचित जनशक्ती पॅनलचे नगर प्रशासन महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केव्हा करणार? ह्या प्रश्नाचे उत्तर सध्या गुलदस्त्यात आहे महाराजांच्या पुतळ्याच्या सौंदर्यकरणाला अडचण ठरणारा शहरातील वरदळीत स्थितअसलेला भारत पेट्रोलियम कंपनीचा धोकादायक सारडा पेट्रोल पंप अद्याप महसूल प्रशासनाने व नगर प्रशासनाने हटवला नाही पेट्रोल पंपाची लीज संपून जवळपास सहा महिने होऊन गेले आहेत लीज नसताना अवैधपणे पेट्रोल पंप चालवण्यात येत आहे त्यासाठी शिवप्रेमींनी आंदोलन केले सदर आंदोलनामध्ये शिवभक्तावर गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांना तुरुंगात राहावे लागले तरी देखील महसूल प्रशासनाने सदर पेट्रोल पंप हटवण्याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाल सुरू केली नाही याबाबत नगर प्रशासन देखील बघायची भूमिका घेत आहे सारडा पेट्रोल पंप यांना लीज वाढवून द्यायची की नाही याबाबतची सुनावणी जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी 30 जानेवारी 2026 रोजी त्यांच्यासमोर ठेवली आहे दरम्यान नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यात काँग्रेस उबाठा व विदर्भ मराठवाडा आघाडी प्रणित जनशक्ती पॅनल चा दणदणीतविजय झाला सत्तेची कायदेशीर सूत्र नगराध्यक्षा सौ तेजश्री संतोष जैन यांनी व त्यांच्या नगरसेवकांनी हातात घेतले आहे विरोधक देखील सक्षम आहेत अशा परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या समोर 30 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या सुनावणी पूर्वी नगराध्यक्षा सौ तेजश्री संतोष जैन यांनी सारडा पेट्रोल पंप हटवावा म्हणून विशेष सर्वसाधारण सभा घेऊन ठराव घ्यायला पाहिजे जेणेकरून सदर ठराव सुनावणीच्या अगोदर जिल्हाधिकारी यांना भेटल्यास त्याचा फायदा भारत पेट्रोलियम कंपनीचा सारडा पेट्रोल पंप कायमस्वरूपी हटवण्यासाठी होऊ शकतो परंतु त्याबाबत नगरअध्यक्षा सौ तेजश्री संतोष जैन यांनी कोणत्याही हालचाली केल्याचे दिसत नाही बांधकाम सभापती प्रकाश शिकारे यांनी तसा प्रस्ताव देऊन विशेष सर्वसाधारण सभा गठीत करण्याच्या सूचना नगराध्यक्षा सौ तेजश्री संतोष जैन यांच्या परवानगीने मुख्याधिकारी यांना द्यायला पाहिजे जेणेकरून 30 जानेवारी 2026 पूर्वी पेट्रोल पंप हटवण्याचा ठराव माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पाठवता येईल
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अडचण ठरणारा सारडा पेट्रोल पंप हटवण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याच्या सूचना काँग्रेस चे नेते साहेबराव कांबळे नंदकिशोर अग्रवाल तातू देशमुख राम देवसरकर व उबाठा नेते एडवोकेट बळीराम मुटकुळे सतीश नाईक प्रशांत पत्तेवार संदीप ठाकरे वगैरे नेते मंडळींनी तसेच विदर्भ मराठवाडा विकास आघाडीचे नेते ऍडव्होकेट संतोष जैन व ईनायत उल्ला जनाब बाळासाहेब नाईक व जनशक्ती पॅनलचे नेते गोपाल अग्रवाल यांनी नगराध्यक्षा सौ तेजश्री संतोषजैन व बांधकाम सभापती प्रकाश शिकारे यांना द्याव्यात अशा अनेक शिवभक्तांच्याअपेक्षा आहेत पाहूया काय होते? तूर्तास एवढेच! बाकी सविस्तर चर्चा तर होणार
विलास चव्हाण–संपादक जय राजसिंहासन उमरखेड
यांची भूमिका
