प्रजासत्ताक दिनी सामाजिक बांधिलकीचा जागर .
महागाव तहसील कार्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमासह बालविवाह प्रतिबंध व तंबाखूमुक्तीची शपथ .
यवतमाळ प्रतिनिधी
तहसील कार्यालय, महागाव यांच्या वतीने २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ वा .प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून देशभक्तीबरोबरच सामाजिक जाणीव व प्रबोधनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस निवासी नायब तहसीलदार श्री. पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, शहरातील सर्व शाळांचे शिक्षक ,शिक्षिका, तहसील कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य व नाट्य सादरीकरण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले बालविवाह प्रतिबंधाची शपथ तसेच तंबाखूमुक्त समाजनिर्मितीची शपथ.
यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांनी बालविवाहास कायमचा आळा घालू तसेच तंबाखूमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करू असा सामूहिक निर्धार व्यक्त केला. लहान वयात होणाऱ्या विवाहामुळे होणारे सामाजिक व आरोग्यविषयक दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांबाबत जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमास पंचायत समितीचे बीडीओ श्री. दत्तात्रय कदम, पुरवठा विभागाचे श्री. कोल्हे, नायब तहसीलदार श्री. पराते, तहसील कर्मचारी ज्येष्ठ पत्रकार संजय भाऊ भगत, गजानन भाऊ वाघमारे यांच्यासह तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते.
या उपक्रमामुळे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य अधिक अर्थपूर्ण ठरले असून, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने महागाव तहसील कार्यालयाने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली. ,शालेय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रशस्ती प्रमाणपत्राचे वाटप .
