महागाव/ नगरपंचायत च्या आगामी निवडणुकीत देशी दारू दुकान ठरणार केंद्रबिंदू

महागाव/ नगरपंचायत च्या आगामी निवडणुकीत देशी दारू दुकान ठरणार केंद्रबिंदू  

 

 

महागांव नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीत देशी दारू दुकान ठरणार केंद्रबिंदू या मथळ्याखाली पहिल्याच पानावर बातमी प्रकाशित केली होती आज दि . २ / २ / २०२६ नगरपंचायतीच्या मासीक सभेचे आयोजन करण्यात आले होते . महागाव नगरपंचायत च्या कारभाराची पोलखोल विरोधी पक्षाचे नगरसेवक विकास कामात सहकार्य करीत नसल्याचा आरोप बिन बुडाचा सभेने वार्षिक अंदाजपत्रकाला मंजुरी दिली . सोबतच सभेच्या अजेंड्यावर महागाव शहरातील प्रभाग १ मधील देशी दारू दुकान बंद करण्याचा ठराव मांडला होता ! परंतु देशी दारू दुकानदार सतत कायद्याच्या पळवटा शोधून काही ठराविक नगरसेवकांना हाताखाली घेऊन दारू दुकान सुरू केले आहे . बांधकामाची कोणतीही रीतसर परवानगी न घेता अवैधपणे शौचालयाचे बांधकाम करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे नगरपंचायत च्या अधिकाऱ्यांकडून अवैध बांधकामाची पाहणी करून रीतसर कारवाई करण्याचा ठराव तातडीने आजच्या सभे मंजूर करण्यात आला तसेच महावितरण कडून विद्युत पुरवठा घेण्यासाठी दुकानदाराने आजच ना हरकत प्रमाणपत्र साठी अर्ज केला होता तो अर्ज नामंजूर केल्यामुळे विद्युत पुरवठा मिळणार नाही आजच्या सभेचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार बांधवांना महागाव नगरपंचायत ने आमंत्रित केले होते सभेमध्ये ज्येष्ठ नगरसेवक संभाजी नरवाडे यांनी महागाव शहरातील दोन्ही दारू दुकानाबाबत तीव्र नापसंती व्यक्त करून महागाव शहराची आणि मी सभागृहात असल्यामुळे माझी वैयक्तिक अकारण बदनामी होत आहे .मागील काळात कुणी काय केले हे शहरातील जनतेला चांगलेच माहित आहे ! आता देशी दारू दुकान बंद चा दार्शनिक ठराव न घेता प्रभाग १ आणि प्रभाग १७ मधील दोन्ही देशी दारू दुकान बंद करण्यासाठी संबंधित प्रभागातील महिलांचे मतदान घेऊन दोन्ही देशी दारू दुकान बंद करण्याचा ठराव घेण्यात आला आहे . यवतमाळ जिल्हाधिकारी, जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी यांचे कडे रीतसर तक्रार करून प्रभाग १ आणि १७ मधील महिलांची सभा बोलावून गांवातील दोन्ही दारू दुकाने कायमची बंद करण्यासाठी सदर संबंधित दोन्ही वार्डातील महिलांचे मतदान घेण्याचा ठराव आजच्या सभेमध्ये पारित करण्यात आला . संभाजीराव नरवाडे यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे महागाव शहरातील दोन्ही देशी दारू दुकाने महिलांचे (आडवी बाटली उभी बाटली ) मतदान प्रक्रिया पार पाडून महिला शक्तीच्या बहुमताच्या जोरावर शहरातील दोनही देशी दारू दुकाने बंद होणार ! यामुळे देशी दारू दुकानदारांचे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे

 

 यवतमाळ विशेष प्रतिनिधी राम चव्हाण महागाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *