छत्रपती संभाजीनगरात निवडणूक कामासाठी ऐनवेळी २५०० कर्मचारी नेमावे लागणार!

छत्रपती संभाजीनगरात निवडणूक कामासाठी ऐनवेळी २५०० कर्मचारी नेमावे लागणार!

खुलताबाद / विशेष प्रतिनिधी

जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक आणि सीईटी परीक्षा या दोन्हींची तारीख एकच असल्याने प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे. अनेक शिक्षक सीईटी परीक्षेत गुंतणार असल्याने आता प्रशासनावर ऐनवेळी दुसऱ्या विभांगातून अडीच हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करून त्यांना घाईघाईने प्रशिक्षण देण्याची वेळ आली आहे.

आधीच्या नियोजनानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार होते.तर सीईटी परीक्षा ७ तारखेला ठरलेली होती. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निवडणुकीची तारीख ७ फेब्रुवारी करण्यात आली. यामुळे प्रशासन अडचणीत आले. कारण प्रशासनाने निवडणुकीच्या कामासाठी १२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. आता त्यातील २५०० कर्मचारी आता सीईटी परीक्षेत अडकणार आहेत. त्यामुळे आता प्रशासनाला आता ऐनवेळी हे २५०० हजार कर्मचारी दुसऱ्या विभागातून निवडणूक कामासाठी नियुक्त करावे लागणार आहेत. एवढेच नाही तर या कर्मचाऱ्यांना घाईघाईने प्रशिक्षण देण्याची वेळही प्रशासनावर आली आहे. उपजिल्हाधिकारी संगिता राठोड यांनीही या कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *