पिंपरी शेत शिवारात पुन्हा एकदा बँकेच्या कर्जात शेतकऱ्यांची आत्महत्या
महागाव तालुक्यातील पिंपरी शेत शिवारात पुन्हा एकदा बँकेच्या कर्जात शेतकऱ्यांची आत्महत्या दि. ४ फेब्रुवारी २०२६ पासून बेपत्ता असलेला पिंपरी शिवारातील दत्तोबाच्या टेकडीजवळ झाडाला गळफास अवस्थेत मृतदेह आढळून आला.ही घटना एका जनावररे चारणाऱ्या व्यक्तीकडून माहिती समोर आली आहे . त्यांनी तत्काळ संबंधितांना माहिती दिल्यानंतर शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ मृतदेह आढळून आला. याप्रकरणी माहिती महागाव पोलीस स्टेशनला कळवली. या घटनेची माहिती मिळताच महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे यांच्या मार्गदर्शनात बीटचे जमादार गजानन येडतकर व पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल रायवाडे यांनी. घटनास्थळी घाटून पंचनामा केला
मूर्त विजय अवधूत कदम यांच्या शेतीवर बँकेचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बँकेच्या कर्जाला कंटाळून पिपरी शेत शिवारात गळफास लावून. विजय अवधूत कदम यांनी जीवन यात्रा संपवली आहे त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय सवना येथे पाठवण्यात आला
जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ यांची रिपोर्ट
