*पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे संत गुलाबराव महाराज यांची जयंती साजरी*
सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन २०२६ मध्ये राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ति संत व समाजसुधारक यांची जयंती शासकिय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने दिनांक ०६ जुलै २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे श्री. सुनिल दरेकर, पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) यांच्या शुभ हस्ते संत गुलाबराव महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तदनंतर मपोका प्रिया बुरेले यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश लावुन उपस्थितांना थोडक्यात माहीती सांगितली.
सदर कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्यासह श्री सुनिल दरेकर पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) यांच्यासह पोनि रेवचंद सिंगनजुडे तसेच गोंदिया पोलीस विभागातील पोलीस अधिकारी/अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ हे मोठया संख्येने उपस्थित होते.
गोरेगांव तालुका प्रतिनिधी महादेव शेन्डे
