जळगाव येथे महिला संघटन सभा उत्साहात संपन्न….
वाकोद प्रतिनिधी…. दीपक गायकवाड..
*दिनांक २६/८/२०२६ रोजी रामानंद संप्रदाय महिला संघटन सभा संपन्न जळगाव*
जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या कृपाशीर्वादाने व रामानंद संप्रदाय उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने महिला संघटन सभेचे आयोजन मोहन टॉकीज असोदा रोड जळगाव येथे करण्यात आले. त्यावेळी संप्रदायाच्या अखिल भारतीय महिला सेना सेक्रेटरी सौ.वृंदा ताई जोशी,उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक च्या महिला निरीक्षक संगीता ताई दहिफळे, महिला जिल्हाध्यक्ष उषाताई कोळी, जिल्हाध्यक्ष गणेश राकडे, त्याचप्रमाणे माजी जिल्हा महिला अध्यक्ष अर्चनाताई राजवैद्य जन्म प्रवचनकार उज्वला पाटील, हेमलता टोके, चिनावले ताई त्याचप्रमाणे जिल्ह्याचे प्रसिद्धी मूल्यांकन प्रमुख विठ्ठल दांगोडे जिल्हा सेवा समिती सर्व तालुक्याचे महिला तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सेवा केंद्र कमिटी भक्त शिष्य साधक आदी भक्तगण सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते जगद्गुरु श्रींच्या प्रतिमेचे पूजन त्याचप्रमाणे दीप प्रज्वलन,ईशस्तवन,स्वागत गीत व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन प्रीतीताई वायकोळे प्रास्ताविक महिला जिल्हाध्यक्ष उषाताई कोळी,मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष गणेश राकडे जेष्ठ गुरु बंधू केले.तदनंतर उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक येथील महिला निरीक्षक यांनी महिला संघटनाबाबतीत मार्गदर्शन केले . त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक सौ.वृंदाताई जोशी यांनी सर्व गुरु भगिनींना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास 1000 महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम खूप उत्साहात साजरा झाला.
