*”न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे विद्यार्थिनी करिता आरोग्य शिबिराचे आयोजन

 

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

 

हिंगोली,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारा संचालित न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथे महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी विद्यार्थिनींनी आरोग्याची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, त्वचेची निगा, योग्य आहार तसेच महिलांच्या विविध आरोग्यविषयक समस्यांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी डॉ. प्रणीता झडपे मॅडम व डॉ. शीतल धुमाळ मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींना दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व, त्वचेची योग्य निगा कशी राखावी, योग्य व संतुलित आहाराचे महत्त्व तसेच महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध समस्यांबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थिनींनी आरोग्य व त्वचेच्या निगेशी संबंधित विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एन.एस.सोळंके सर होते. अध्य‌क्षीय समारोप करताना मा.प्राचार्य डॉ.एन.एस.सोळंके सर आपले मत वक्त करताना म्हणाले अशा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनीमध्ये जागरूकता निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल. या कार्यक्रमाच्या संयोजिका म्हणून डॉ.लक्ष्मी गलांडे होत्या.सूत्रसंचालन प्रा.शिर्के एस.पी,तर आभार प्रदर्शन प्रा. किरवले यु.डी., प्रा.करंडे ए.ए.,प्रा.तापडिया व्हि.जे., डॉ.काशिदे वाय.एम., डॉ.कदम ए.एम., प्रा.चव्हाण बी.बी., प्रा.काशिदे एस.एस., डॉ.पुरी के.एल.,प्रा.शेख जुनेद, डॉ.खंदारे एस. वाय.,प्रा.गोरे जी.यु., डॉ.वासनिक पी.एस.,प्रा.सातपूते आर. ए., डॉ.कोल्हे आर. डी., प्रा.चव्हाण एस.ए., डॉ.पाटील एस.जी.,प्रा.अवचार ए.ए. डॉ.मापारी एस.के.,प्रा.खर्जुले एस.ए.,प्रा.लेमले , विद्यार्थ्यी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *