*सोयगांव तालुक्यातील घानेगाव ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार आदिवासी समाजाच्या मुले, मुली, यांच्या जन्म दाखला नोंदी नाही, घरकुल, व शासनाच्या वेगवेगळ्या योजना पासून कोसोदूर* *खासदार, कल्याण काळे, आमदार अब्दुल सत्तार, ईद्रीस मुलतानी, सभापती उत्तम चव्हाण, आदिवासी समाजाला न्याय देणार का*?
सोयगाव तालुका प्रतिनिधी संतोष गर्दे
————————ग्राउंड रिपोर्ट, सोयगांव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या घानेगाव येथील आदिवासी समाज हा शासनाच्या मिळणाऱ्या वेगवेगळ्या योजना पासून कोसोदूर आहे. सविस्तर वृत्त असे कि, घानेगाव येथील आदिवासी समाज आजही गुलामी सारखा जगत आहे.देशाला स्वातंत्र्य मिळून आज ८० वर्षे झाले. मात्र घानेगाव येथील आदिवासी समाजाला स्वातंत्र्य मिळाले नाही त्या ठिकाणची विदारक परिस्थिती आज डोळ्यसमोर चित्र बघायला मिळत आहे. आजहि आदिवासी समाज हा कच्चे मातीचे घरे, कुडात राहत आहे. घानेगाव तांडा ग्रामपंचायत मध्ये २०१४ पासून आदिवासी समाजाच्या त्यांच्या मुलांच्या जन्मनोंदीच नोंदविलेल्या नाही. असे धक्कादायक वास्तव समोर आलेले आहे. अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी यांनी स्वतः हा च्या कर्तव्या मध्ये हलगर्जी पणा केल्यामुळेच आदिवासी समाजावर आधार कार्ड, बँकेचे खाते, साठी कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामपंचायत मध्ये जन्माच्या नोंदीच नाही. या साठी बेजबाबदार कोण असा गँभीर प्रश्न उपस्थित होत आहे.आदिवासी समाजाची ग्रामपंचायतला एकमेव महिला सदस्य, असताना आदिवासी समाजाच्या वस्ती मधील मुलांच्या जन्मनोंदी, रस्ते, पाणी, घरकुल, कब्रस्थान, विदयुत पोल, या समस्या बद्दल ग्रामपंचायत ग्रामसभेत मासिक सभेत ठराव घेण्यासाठी अनेक वेळा सांगितले मात्र सरपंच, उपसरपंच, यांनी त्यांचा आवाज दाबन्याचा प्रयत्न केला. २०१४ साली आदिवासी समाजाच्या महिला, या जन्म नोंदी साठी वारंवार अंगणवाडी सेविका, कडे व ग्रामपंचायत ला संगणक ऑपरेटर कडे नोंद करण्यासाठी गेले असता त्यांना फक्त कर्मचाऱ्यांनी स्वतः हा ची चूक असताना अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत मध्ये जाण्यासाठी सांगायच्या, तर ग्रामपंचायत ऑपरेटर हा अंगणवाडी सेविका कडे बोट दाखवून अशिक्षित महिलां असलेल्या आदिवासी समाजाला चकरा वर चकरा मारून मारून त्यांना वेड्या मध्ये काढायचे आदिवासी समाज हा हातावर पोट भरणारा समाज आहे. आपला उरनिर्वाह करण्यासाठी हाताला मिळेल ते काम करून घर संसाराचा गाडा चालवतात समाज अशिक्षित असल्यामुळे त्यांना दाखले, प्रमाणपत्र कागदपत्रे समजत नाही. याचाच फायदा घेत कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात स्वतः हा ची चूक लपवण्यासाठी अंग झटकन्याचे काम केलेले आहे. त्यामुळेच आज आदिवासी समाजाच्या मुलांच्या जन्मनोंदी नाही. त्यामुळेच त्यांचे आधार कार्ड काढण्यासाठी ग्रामविकास अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत ने प्रशासनाला कुठलाही पाठवपुरावा केलेला नाही. या मुळे लहान मुलांचे भविष्य अंधारात आहे. शासनाच्या शिष्यवृत्ती पासून ते शाळेत शिक्षण घेण्यासाठी व शासनाच्या मिळणाऱ्या योजना पासून घानेगाव येथील आदिवासी समाज आज यातना सहन करत आहे. या साठी त्यांनी अनेक वेळा आपली व्यथा, समस्या, ह्या लोकप्रतिनिधी आमदार अब्दुल सत्तार, ईद्रीस मुलतानी यांच्या पर्यंत फोन करून, त्यांच्या कार्यर्त्यांन पर्यंत भावना पोहचवल्या मात्र लोकप्रतिनिधी यांनी फक्त पोकळ आश्वासने देऊन वेळ काढून बघू, करूया असे सांगून दुर्लक्ष केले. समक्ष त्यांच्या वस्तीत त्यांना भेटून कधीही त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे काम एकही लोकप्रतिनिधी यांनी केले नाही. लोकप्रतिनिधी हे सावळदबारा, देव्हारी, डाभा, पिंपळवाडी, नांदातांडा, महालबधा, घानेगाव तांडा, या गावांना जास्त महत्व देतात. मात्र घानेगावला सावत्र सारखी वागणूक आमच्या आदिवासी समाजाला मिळत आहे. त्यांना फक्त निवडणूक पुरती आमचे मतदान आठवते अशी तीव्र खंत नाराजी,व भावना त्यांनी पत्रकार बांधव यांना सांगितली त्यामुळे आदिवासी समाज हा येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक मध्ये बहिष्कार टाकणार असून जो पर्यंत त्यांच्या समस्या अडीअडचणी, ग्रामपंचायत जन्मदाखला नोंदी, घरकुल,रस्ते,स्वतंत्र विद्दूत पुरवठा डी.पी.या सर्व समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आदिवासी समाजाला समक्ष भेटून प्रशासनाला आदेश देऊन समस्याची दखल घेणार का? तो पर्यंत आम्ही एकही लोकप्रतिनिधी यांना आपले मतदान देणार नाही असा पवित्रा त्यांनी हाती घेतला असून. आमदार अब्दुल सत्तार, ईद्रीस मुलतानी हे घाणेगाव येथील आदिवासी समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्या समस्या सोडवणार का? हे बघणे येणाऱ्या काळात तितकेच महत्वाचे ठरणार आहे.
