शारीरिक शिक्षण शिक्षकांचे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी दि. 08 जुलै 2026 रोजी पासून बेमुदत धरणे आंदोलन !

 

 

पुणे -शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये शारीरिक शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून शारीरिक शिक्षण विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक बौद्धिक विकासासह सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असणारा विषय आहे . शारीरिक व मानसिक सुदृढतेच्या माध्यमातून सक्षम समाज निर्मिती, बलशाली राष्ट्रनिर्मितीच्या वाटचालीमध्ये या विषयाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शारीरिक शिक्षण विषयाच्या माध्यमातून ऑलिम्पिंक पदकाचा पाया रचला जात आहे. शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये या विषयाच्या अध्यापनाचे काम करणारे शारीरिक शिक्षण शिक्षक यांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

राज्यात गेल्या वीस वर्षांपासून शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदभरतीला शासनाने दुर्लक्ष केल्याने हजारो बी.पी.एड. व एम.पी.एड. पदवीधर आजही बेरोजगार आहेत. या दीर्घकालीन अन्यायाविरोधात महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने अखेर थेट लढाईचा बिगुल फुंकला असून बुधवार दि. 08 जुलै 2026 रोजी पासून आझाद मैदान मंत्रालय ,मुंबई या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन जाहीर केले आहे.

या बेमुदत धरणे आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने शारीरिक शिक्षक शिक्षक सहभागी होणार आहेत. हे बेमुदत धरणे आंदोलन पूर्णपणे शांततामय व कायदेशीर मार्गाने करण्यात येणार आहे.

सदर आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे-

*प्रमुख मागण्या* :

1) क्रीडा शिक्षकांची सेवा प्रवेश नियमावली व सेवा शर्ती तात्काळ जाहीर करून भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी.

 

2) शासन निर्णय दि. 02 जानेवारी 2026 नुसार मंजूर 4,860 क्रीडा शिक्षकांची सर्व पदे (100%) पवित्र पोर्टल TAIT-2025 भरतीच्या पहिल्या टप्प्यात भरण्यात यावीत.

3) दि. 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार रिक्त होणाऱ्या शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदांवर इतर विषय शिक्षकांचे समायोजन न करता ती पदे पवित्र पोर्टलमार्फत भरावीत.

4) जिल्हा परिषद केंद्रशाळा, माध्यमिक शाळा, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय आश्रमशाळा तसेच समाजकल्याण विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शारीरिक शिक्षण (क्रीडा) शिक्षकांची रिक्त पदे पवित्र पोर्टलमार्फत भरावीत.

पवित्र पोर्टल TAIT-2025 भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी.

सदर बेमुदत धरणे आंदोलनामध्ये बुधवार दि. 08 जुलै 2026 रोजी पासून राज्यभरातील हजारो पात्रता धारक शिक्षक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मार्गदर्शक श्री. प्रदुम्न जोशी. श्री .कैलास माने श्री. विश्वनाथ पाटोळे ,श्री. अमोल जोशी , राज्याध्यक्ष श्री.संदीप मनोरे, राज्य सचिव श्री.तायाप्पा शेंडगे व सर्व राज्य कोअर कमिटी सदस्य, प्रा.अभिजित पवार सचिव यवतमाळ व जितेंद्र यादव अध्यक्ष यूवा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना यवतमाळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *