भाजपाचा महागाव नगरपंचायत वर ठसा किंग मेकर जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा व नगराध्यक्ष सौ. रंजना दीपक आडे यांच्या उपस्थितीत विविध विषय समित्यांच्या पदाची निवड
जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ
महागांव नगरपंचायतीच्या कामकाजाला अधिक गती आणि कार्यक्षमतेसाठी विशेष समित्यांची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी पुढीलप्रमाणे सभापतींची निवड करण्यात आली आहे:बांधकाम समिती – विशाल पांडे
आरोग्य समिती – सुनीता डाखोरे
नियोजन समिती – शाखा भारवाडे
पाणी पुरवठा समिती – सुरेश नरवाडे.या निवडीमुळे नगरपंचायतीच्या विविध विकासकामांना चालना मिळणार असून शहरातील मूलभूत सुविधांच्या उभारणीस आणि नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देण्यास मदत होणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
महागाव नगरपंचायतीत स्थापन करण्यात आलेल्या या विशेष समित्यांमुळे प्रशासन अधिक सक्षम व परिणामकारकपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
