पारशीवणी येथे ११० लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेची बैठक

पारशीवणी येथे ११० लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेची बैठक

कन्हान

संजय गांधी निराधार विभागांतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य सेवानिवृत्ती योजनेच्या समित्यांची बैठक तहसील कार्यालयात झाली. पात्र लाभार्थ्यांच्या अर्जावर चर्चा करून मोठ्या प्रमाणात प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राजू भोस्कर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. समिती सदस्य प्रेम भांडेकर, डॉ. मनोहर पाठक, माधुरी बावनकुळे, सुधाकर गजबे, नायब तहसीलदार दयाराम कुंभारे, संजय गांधी निराधार विभागाचे अधिकारी प्रशांत गजभिये उपस्थित होते. सभेत संजय गांधी निराधार योजनेसाठीचे ५२ अर्ज आणि श्रावणबाळ योजनेसाठीचे ५८ अर्ज मंजूर करण्यात आले. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करून नियमांनुसार ते मंजूर करण्यात आले.समितीने मंजूर केलेल्या. प्रस्तावांवर तहसीलदार सुरेश वाघचौरे आणि नायब तहसीलदार दयाराम कुंभारे यांची सहमती व स्वाक्षरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या आठवड्यात अंतिम यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती

देण्यात आली. समितीचे अध्यक्ष राजू भोस्कर म्हणाले की, पात्र आणि गरजू नागरिकांना सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ वेळेवर देण्यासाठी समिती सातत्याने कार्यरत आहे. सर्व सदस्यांच्या सहकार्याने आणि लाभार्थ्यांच्या हितासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या ठरावासह सभेचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *