टीम समर्पण फाउंडेशनच्या पुढाकाराने २२ जुलै रोजी सोयगावात भव्य मोफत महाआरोग्य शिबीर

टीम समर्पण फाउंडेशनच्या पुढाकाराने २२ जुलै रोजी सोयगावात भव्य मोफत महाआरोग्य शिबीर

५० लाखांपर्यंतच्या गंभीर आजारांवर मोफत निदान व उपचारासाठी मार्गदर्शन

सोयगाव / प्रतिनिधी संतोष गर्दे

सोयगाव : सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टीम समर्पण फाउंडेशन आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय, सोयगाव येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

हे शिबीर सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत होणार असून, नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी, आवश्यकतेनुसार मोफत औषधे, ईसीजी, रक्तदाब, रक्तातील साखर, नेत्र, दंत, कान-नाक-घसा, हृदयरोग, किडनी, कर्करोग, अस्थिरोग, फिजिओथेरपी, मानसिक आरोग्य तसेच आयुर्वेदिक व होमिओपॅथिक सल्ला अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

याशिवाय जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, बालरोग, अस्थिरोग, हृदयरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, नेत्ररोग, दंत, कान-नाक-घसा, मूत्रपिंड, कर्करोग, फिजिओथेरपी, मानसिक आरोग्य, आयुर्वेद आणि होमिओपॅथी या विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत.

 

या महाआरोग्य शिबिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे ५० लाखांपर्यंतच्या गंभीर आजारांवर मोफत निदान व उपचारासाठी मार्गदर्शन, तसेच ५६ प्रकारच्या रक्त तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून रोगनिदानाची सुविधा उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणीमुळे उपचारापासून वंचित राहणाऱ्या गरजू रुग्णांसाठी हे शिबीर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

 

याबाबत टीम समर्पण फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, “समाजातील कोणताही रुग्ण केवळ आर्थिक अडचणीमुळे उपचारापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. सोयगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी, कामगार आणि गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच ही माहिती आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि गरजू रुग्णांपर्यंत अवश्य पोहोचवावी.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *