पेपरफुटी’ आणि ‘वांगचुक’ यांच्यावरील कारवाईविरोधात मौद्यात संताप; विद्यार्थ्यांचा एल्गार!मौदा:

पेपरफुटी’ आणि ‘वांगचुक’ यांच्यावरील कारवाईविरोधात मौद्यात संताप; विद्यार्थ्यांचा एल्गार!मौदा:

 

NEET, TET सह विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घोटाळ्यांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या गंभीर प्रकाराचा निषेध करण्यासाठी आणि दिल्ली मधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर झालेल्या दडपशाहीचा जाब विचारण्यासाठी मौदा येथे विद्यार्थी, पालक आणि आंदोलक रस्त्यावर उतरले. रविवार, १९ जुलै रोजी मौदा तहसील कार्यालयासमोर विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले.मुख्य मागण्या आणि आंदोलनाचा पवित्रा:दोषींना तात्काळ जेलमध्ये टाका: पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करा.शिक्षण व्यवस्था पारदर्शक करा: शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार थांबवून व्यवस्था अधिक विश्वासार्ह बनवा.दडपशाहीचा तीव्र निषेध: सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर करण्यात आलेली दडपशाही खपवून घेतली जाणार नाही.रामटेकमध्येही आंदोलनाची धगनवी दिल्ली येथे २० जुलै रोजी आयोजित ‘संसद मार्च’च्या समर्थनार्थ रामटेक येथेही जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ (SFI) आणि ‘डेमॉक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया’ (DYFI) नागपूर जिल्हा कमिटीने नायब तहसीलदारांमार्फत सरकारला इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आयश घोष आणि एम. साजी यांच्या नेतृत्वात आमरण उपोषणही सुरू करण्यात आले आहे.आंदोलकांचा इशारामौदा येथील उपनगराध्यक्ष शुभम तिघरे, ज्ञानेश्वर वानखेडे, आणि इतर प्रमुख नेत्यांसह शेकडो विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सरकार पाठीशी घालत असेल, तर हे आंदोलन अधिक उग्र होईल,” असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आंदोलनानंतर योगिता दराडे नायब तहसीलदारांमार्फत मौदा शासनाला मागण्यांचे कडक निवेदन सादर करण्यात आले.

नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *