पूण्यश्लोक विधानिकेतन खुमारीमध्ये ‘जागतिक व्याघ्र दिन’ उत्साहात साजरा जागतिक व्याघ्र

पूण्यश्लोक विधानिकेतन खुमारीमध्ये ‘जागतिक व्याघ्र दिन’ उत्साहात साजरा जागतिक व्याघ्र दिनानिमित्त दि. 29 जुलै रोजी रामटेक तालुक्यातील पुण्यश्लोक विद्यानिकेतन खुमारी येथे विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम अक्षय गजभिये (उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर), कु. पूजा लिंबगावकर (सहायक वनसंरक्षक) व जयेश तायडे (वनपरिक्षेत्र अधिकारी, चोरबाहुली – वन्यजीव) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

 

या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका अर्चना यादव, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिना निमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

 

यामध्ये चित्रकला स्पर्धेत 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून “मानव व वन्यजीव संघर्ष” या विषयावर प्रभावी चित्रे साकारली. तसेच वक्तृत्व स्पर्धेत 05 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत “मानव व वाघ यांचे सहजीवन” या विषयावर उत्कृष्ठ विचार मांडले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ.अर्चना यादव होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून तुळशीदास राऊत सरपंच, बोरडा , पंकज चौधरी पत्रकार व उपसरपंच, बोरडा उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी व्याघ्र संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

बि. जी. लोडे (वनरक्षक, अंबाझरी) यांनी व्याघ्र दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. स्पर्धांमधील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके प्रदान करण्यात आली.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियंका साव यांनी केले, सूत्रसंचालन ठवकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन तामखाणे सर यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

 

सिटी इंडिया न्यूज करीता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *