*आज टीम समर्पण फाउंडेशनच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकोद येथे आमचे मित्र तथा मा. जिल्हा परिषद सदस्य श्री. अमित भाऊ देशमुख यांची सदिच्छा भेट घेण्याचा योग आला.*
प्रतिनिधी संतोष गर्दे
यावेळी त्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करण्याची संधी मिळाली. विशेषतः श्री क्षेत्र चौंडेश्वर महादेव मंदिर येथे सुरू असलेले विकासकाम अत्यंत दर्जेदार, नियोजनबद्ध आणि उल्लेखनीय असून, ते अमित भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून विकासाची स्पष्ट दृष्टी, गुणवत्तापूर्ण कामे आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यांचे हे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीने अशा विकासकामांचा आदर्श घेऊन आपल्या परिसराच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करावेत, हीच अपेक्षा.
