रेल्वेच्या धडकेत सख्ख्या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू

रेल्वेच्या धडकेत सख्ख्या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू

सावनेर येथे गुरुवारी सकाळी अंदाजे १०.१५ वाजताच्या सुमारास रेल्वेच्या धडकेत सख्ख्या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते हीतेश बनसोड यांना अंकित हांडे यांनी दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सावनेर पोलीस आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.

मृतांची ओळख निरंजन लक्ष्मण फिरके (वय ४० वर्षे) व योगेश लक्ष्मण फिरके (वय ३७ वर्षे), दोघेही रा. सावनेर अशी झाली आहे.

हितज्योती आधार फाउंडेशनच्या टीमने व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतांना घटनास्थळावरून उचलून सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले.

ही घटना नेमकी कशी घडली, याचा तपास सावनेर पोलीस करीत आहेत.

मदत करणारे हितज्योती आधार फाउंडेशन टीम सदस्य :

अंकित हांडे, नरेंद्र समदूरकर, आकाश यादव, अण्णा सिंदेवार, आर्यन कातकडे तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मदतकार्य केले.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *