डॉ. विनोद सुधाकर पवार यांना भारत गौरव पुरस्कार प्रदान

डॉ. विनोद सुधाकर पवार यांना भारत गौरव पुरस्कार प्रदान

 

पुणे : साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने पुणे येथे आयोजित विश्व शांती व भारत गौरव पुरस्कार सोहळा २०२६ उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात सामाजिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. विनोद सुधाकर पवार, जळगाव जिल्हा प्रतिनिधी, टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज यांना प्रतिष्ठेचा “भारत गौरव पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

 

कार्यक्रमास सेशन कोर्ट न्यायाधीश माननीय सुभाष हारताळकर, प्राचार्य डॉ. प्रदीपा नायर, पुणे पोलीस आयुक्तांचे सहाय्यक सुनील हिरुरकर, अस्तित्व कला मंचचे अध्यक्ष व बँक चेअरमन योगेश गोंधळे, भारताचे ८ वेळा आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेते श्याम सहानी, Wizetronचे चेअरमन नाझिम शेख, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग अधिकारी डॉ. मदन कोथुळे तसेच अॅड. नौशाद फर्निचरवाला यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. डॉ. विनोद सुधाकर पवार यांना भारत गौरव पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या कार्याची आणि सामाजिक योगदानाची दखल घेण्यात आली आहे. ते टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.

 

साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष फेरोज खान यांनी डॉ. विनोद सुधाकर पवार यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

या पुरस्कारामुळे डॉ. विनोद सुधाकर पवार यांच्यावर विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याला या सन्मानामुळे नवी प्रेरणा मिळाली आहे. सोहळ्यात सामाजिक सेवा, शिक्षण, क्रीडा, पोलीस सेवा, व्यवसाय, योग, महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *