सालेकसा पोलिसांची धडक कारवाई; सालेकसा येथे ७.४० लाखांची अवैध दारू जप्त गोंदिया

सालेकसा पोलिसांची धडक कारवाई; सालेकसा येथे ७.४० लाखांची अवैध दारू जप्त

गोंदिया

:जिल्ह्यात अवैध दारू विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गोंदिया पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली सालेकसा पोलिसांनी २१ जून २०२६ रोजी मौजा गिरोला ते तिरखेडी जाणाऱ्या मार्गावर ही धडक कारवाई केली.४ लाखांची दारू आणि वाहन जप्तपोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गिरोला ते तिरखेडी रोडवर अंदाजे ०४ किमी दक्षिणेस एका संशयित पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो वाहनाला (क्र. MH-28-V-4420) अडवून पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. या वाहनात ‘रॉकेट’ देशी दारूच्या प्रत्येकी १०० नग असलेल्या ६० पेट्या (९० मिली चे प्लास्टिक पाऊच) आढळून आले. एकूण ६००० पाऊच (किंमत रु. २,४०,०००) आणि वाहतुकीसाठी वापरलेले बोलेरो वाहन (किंमत रु. ५,००,०००), असा एकूण रु. ७,४०,००० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दोन आरोपींना अटक

कोणत्याही वैध पास किंवा परवान्याशिवाय अवैधरित्या देशी दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना जागेवरच ताब्यात घेतले.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी :संजय सदाशिव राऊत (वय ५० वर्षे)गणेश ईश्वर निकोडे (वय ३६ वर्षे)गुन्हा दाखलआरोपींनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्याने, या प्रकरणी सालेकसा पोलीस ठाण्यात अप. क्र. ३११/२०२६ अंतर्गत कलम ६५ (अ), ६५ (ई), ७७ (अ), ७७ (ब), ८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाही भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. खांडवाये, व त्यांच्या चमूने केली आहे.

गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *