*मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर*
*” खुनाचा प्रयत्न करणा-या दोन सराईत गुन्हेगारांना मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केले जेरबंद “*
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे दिनांक २७/०७/२०२६ रोजी गु.र.नं. १४८/२०२६ १०९ (२),११८(१),३५२,३५१ (२) ३(५), भारतीय हत्यार अधिनियम कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल असुन दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांना दिनांक २६/०७/२०२६ रोजी सायंकाळी १८.३० च्या सुमारास जुना राग मनात धरुन साईबाबा मंदीरा समोरील सार्वजनिक रत्त्यावर, आंबेडकर नगर, मार्केटयार्ड, पुणे येथे दाखल गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार नामे १) आरमान समीर शेख, अंदाजे वय-२० वर्षे, रा. आंबेडकर नगर, गल्ली नं. १३, मार्केटयार्ड, पुणे २) शाहरुख शेख, वय-२४ वर्षे, रा. आंबेडकर नगर, गल्ली नं. १५, मार्केटयार्ड पुणे यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने मारहाण करुन जखमी करुन पसार झाले होते. तरी सदर आरोपी यांना ताब्यात घेणे करीता मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे तपास पथक हे तात्काळ रवाना झाले होते.
दिनांक २८/०७/२०२६ रोजी पहाटे तपास पथकातील पोलीस हवालदार/३४५३ राजेश थोरात त्यांचे गुप्त माहीतीगारा मार्फत माहिती मिळाली कि, सदर आरोपी हे पुणे शहरातुन परराज्यात पसार होणार आहेत. तरी सदर बातमीच्या अनुषंगाने तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक अक्षयकुमार गडगडे, श्रेणी पोलीस उप-निरीक्षक सुनिल भापकर, पोलीस हवालदार/३४५३ राजेश थोरात, पोलीस हवालदार/९६३ महेश जेधे, पोलीस हवालदार ६५८/ कौस्तुभ जाधव, पोलीस हवालदार/४०९४ दत्तात्रय राऊत, पोलीस अंमलदार/८९६५ बालाजी शिंदे, पोलीस अंमलदार/१०२८५ दिनेश माने यांनी सापळा रचुन सदर आरोपी यांना दिनांक २८/०७/२०२६ रोजी पहाटे ०४.०० वा. हडपसर येथुन ताब्यात घेतले आहे. तरी सदर गुन्हाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक बसवराज माळी हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री अमितेश कुमार, साो. पोलीस आयुक्त, पुणे शहर. श्री संजय दराडे साो. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर. श्री राजेश बनसोडे साो. अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर. श्री मिलींद मोहिते साो. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२ पुणे शहर, श्री राहुल आवारे साो. सहा पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत जगताप व श्रीमती सुनिता नवले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे आदेशाने तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक अक्षयकुमार गडगडे, श्रेणी पोलीस उप-निरीक्षक सुनिल भापकर, पोलीस हवालदार/३४५३ राजेश थोरात, पोलीस हवालदार/९६३ महेश जेधे, पोलीस हवालदार ६५८/ कौस्तुभ जाधव, पोलीस हवालदार/४०९४ दत्तात्रय राऊत, पोलीस अंमलदार/८९६५ बालाजी शिंदे, पोलीस अंमलदार/१०२८५ दिनेश माने यांनी केली आहे.
पुणे पोलीस
*विश्वजीत जगताप*.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केटयार्ड पो. ठाणे. पुणे शहर
