महागाव तालुक्यात अवैध मोहाच्या दारूविरोधात धडक मोहीम

महागाव तालुक्यात अवैध मोहाच्या दारूविरोधात धडक मोहीम

 

 

यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर

 

 

महागाव तालुक्यात अवैध हातभट्टी व मोहाच्या दारूविरोधात महागाव पोलीस स्टेशनने धडक कारवाई सुरू केली असून, या मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रभारी अधिकारी एपीआय आंबोरे यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर कठोर कारवाईची भूमिका घेत मोहिमेची सुरुवात केली आहे.

या कारवाईदरम्यान सुनील दिगंबर कांबळे, तिवरंग ,अशोक पांडुरंग जाधव (बाबासाहेब नगर, पोखरी), विलास दत्ता जाधव (साधू नगर), विनोद साहेबराव कांबळे तिवरंग, तसेच संतोष विकास नरवाडे (महागाव) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम 65(1), 65(ई) तसेच संबंधित गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. अवैध मोहाची दारू तयार करणे व साठवणूक करणे याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

एपीआय आंबूरे यांच्या मार्गदर्शनाखाली महागाव पोलीस स्टेशनचे जमादार व कर्मचारी यांच्या पथकाने संयुक्तरीत्या ही कारवाई केली. विशेष म्हणजे या प्रकरणांमध्ये पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हे दाखल केल्याने कारवाईची गंभीरता अधोरेखित झाली आहे.

पोलिसांनी अशी मोहीम नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हातभट्टी दारूमुळे होणारी आर्थिक, सामाजिक व आरोग्यविषयक हानी तसेच जीवितास निर्माण होणारा धोका रोखण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

मागील दोन ते तीन वर्षांपासून तालुक्यात काही ठिकाणी अवैध दारू व्यवसाय खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. मात्र आता सुरू झालेल्या धडक कारवाईमुळे अवैध व्यवसायांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महागावसह विविध गावांतील नागरिकांनी पोलिसांच्या या मोहिमेचे स्वागत केले असून, हातभट्टी दारूमुक्त तालुका करण्यासाठी अशाच प्रकारच्या सातत्यपूर्ण कारवाईची मागणी केली आहे. स्थानिकांच्या मते, यापूर्वी एवढ्या व्यापक स्वरूपात अवैध दारू व्यवसायाविरोधात कारवाई झाल्याचे पाहायला मिळालेच नाही असे जनतेतुन प्रश्न निर्माण होत आहे कायदा सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होऊन गुन्हे दाखल होतील असे प्रभारी ठाणेदार एपीआय आंबूरे यांची स्पष्ट भूमिका घेतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *