आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्याकडून १ महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द..

आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्याकडून १ महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द..

 

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

 

सध्या राज्यात पावसाच्या अभावामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी बांधव मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. बळीराजाला या संकटातून सावरण्यासाठी प्रशासकीय व वैयक्तिक स्तरावर मदत करणे अत्यंत गरजेचे आहे.

हीच सामाजिक बांधिलकी जपत हिंगोली मतदारसंघाचे आमदार मा. श्री. तान्हाजी साखरामजी मुटकुळे यांनी आपल्या एका महिन्याचे मानधन एकूण ₹२,११,०००/- (दोन लाख अकरा हजार रुपये) मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे जिल्हाधिकारी श्री राहुल जी गुप्ता यांना धनादेश सादर केला.

आपल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत! यावेळी माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे, के.के. शिंदे, प्रशांत गोल्डी, संतोषराव टेकाळे, माणिकराव लोडे, रजनीश पुरोहित, विलास गोरे, मोतीराम इंगोले,श्रीरंग राठोड, पद्माकर नायक, हनुमान कऱ्हाळे, वैजनाथ शिंदे, राहुल शिंदे,भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *