लढा क्रांतीचा लढा कलावंतांचा 

लढा क्रांतीचा लढा कलावंतांचा

दि, 30-6-2026 ला “सांस्कृतिक लोककला मंच कळमेश्वर ‘ या संघटनेच्या माध्यमातून काटोल येथील “त्रीरत्न महिला भजन मंडळ” यांनी मिटिंग च्या माध्यमात खुप सुंदर प्रोग्राम आयोजीत केला या कार्यक्रमाला लाभलेले सांस्कृतिक लोककला मंचचे अध्यक्ष मा, प्रमोद भाऊ बागडे होते, कार्यक्रमाचे ऊदघाटक म्हणून काटोल च्या माजी नगराध्यक्ष व नगरसेवीका मा , वैशाली ताई ठाकुर, तसेच उत्कृष्ट कलावंत भोयर सर , कटरे दादा, व काटोल चे माजी सभापती डिगांबर भाऊ डोंगरे व त्यांच्या धर्म पत्नी नव्यानेच नगरसेवीका सौ प्रज्ञा ताई डोंगरे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद भाऊ बागडे यांनी कलावंतांना योग्य न्याय मिळावा असे मनोगत व्यक्त केले

या मिटिंगचा कार्यक्रम छोटेखानी असुन पण भव्य मेळाव्याचे स्वरूप आले होते आणी यशस्वी साठी त्रिरत्न महिला भजन मंडळ च्या अध्यक्षा मीनाताई पाटील यांनी आयोजकाची धुरा सांभाळली व कार्यक्रम घडून आला , पारडसिंगा येथील भजन मंडळ घरत वाडा येथील व अनेक गावचे भजन मंडळ सामील झाले व भुलेश्वर वाघमारे, पुरूषोत्तम पारधी, अनिता ताई कटरे, किशोर भाउ फयदे ,ईंद्रसेन शडामे, नरेंद्र ठाकरे, विवेक जी धनगरे तसेच नंदकिशोर पाटील यांची जील्हाप्रसिध्दि प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली व शांताबाई नारनवरे यांची काटोल तालुका महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली कार्यक्रमचे प्रास्ताविक मीनाताई पाटील यांनी केले, सुत्र संचालन सरिताताई रामटेके वनीताताई बागडे यांनी केले, व आभारप्रदर्शन आश्विनी बागडे यांनी केले

तसेच त्रिरत्न महिला संच सदस्या व कोषाध्यक्ष कांताबाई वरघट, शांताबाई नारनवरे, कालिंदा राऊत, हिराबाई चक्रपाणी,किरण गायकवाड, नीलिमा रोहणकर, सुलोचना मानेराव, मनिषा शेंडे, व अनेक लोकांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला

प्रतिनिधी arvindra Madane काटोल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *