महसूल विभागाचे ‘रेती माफिया’वर मेहेरनजर? पोलिसांच्या कारवाईनंतर तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

महसूल विभागाचे ‘रेती माफिया’वर मेहेरनजर? पोलिसांच्या कारवाईनंतर तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

 

भंडारा (प्रतिनिधी):

पवनी पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर धडक कारवाई करून १६ लाख रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, ज्या महसूल विभागावर रेती चोरी रोखण्याची प्राथमिक जबाबदारी आहे, तो विभाग आणि विशेषतः तहसीलदार कार्यालय या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष का करत आहे? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

पोलिसांची तत्परता, महसूलची सुस्ती:

दिनांक ०४/०७/२०२६ रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत विनापरवाना रेती उपसा आणि वाहतूक उघडकीस आली. पोलिसांकडे मर्यादित मनुष्यबळ असतानाही ते गुन्हेगारांवर वचक बसवत आहेत. याउलट, तालुक्यात ठिकठिकाणी अवैध रेतीचे साठे आणि उत्खनन सुरू असतानाही तहसीलदारांचे भरारी पथक सुस्त का आहे? पोलिसांना मिळणारी गुप्त माहिती महसूल विभागापर्यंत पोहोचत नाही की जाणीवपूर्वक त्याकडे डोळेझाक केली जाते?

तालुक्यात अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदारांना नाही का?

 

पोलिसांच्या कारवाईनंतर तरी महसूल विभाग खडबडून जागा होणार का?

 

रेती माफियांना महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचे अभय तर नाही ना?

 

पवनी तालुक्यातील नैसर्गिक संपत्तीची लूट सुरू असताना महसूल विभागाने आपली जबाबदारी झटकणे चिंताजनक आहे. आता भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून तहसीलदारांना जाब विचारण्याची मागणी जोर धरत आहे

 

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *