न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

*न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

 

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

हिंगोली ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा संचलित न्यू माॅडेल डिग्री काॅलेज हिंगोली येथे आज दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय

यांची 110 वी जयंती ‘अंत्योदय दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. एन. एस. सोळंके सर होते. त्यांच्या हस्ते पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. त्यावेळी प्रा. डॉ. अतिश कदम यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. पंडीत दीनदयाळ उपाध्याय

यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

उपस्थित सर्वांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी आदरणीय प्राचार्य डॉ. एन. एस. सोळंके, प्रा. डॉ. ए. एम. कदम, डॉ. एस. आर. काळबांडे, डॉ. सुभाष मापारी, प्रा. बी. बी. चव्हाण, डॉ. संभाजी चौतमाल, प्रा. स्नेहा शिर्के, प्रा‌. उषा किरवले, प्रा. अलका करंडे, डॉ. सिद्धार्थ खंदारे, प्रा. श्याम खर्जुले, प्रा. विजय कांबळे, प्रा. गोपाल जाधव, प्रा. एस. ए. चव्हाण, प्रा. जुनेद शेख, प्रा. सिध्दार्थ काशिदे

तसेच श्री. गजानन शिंदे, श्री. रामचंद्र अंकुशकर, श्री. अशोक कऱ्हाळे

विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *