वडोदा पोलिसांची मोठी कारवाई;

वडोदा पोलिसांची मोठी कारवाई; अवैध देशी दारूची वाहतूक करणारी बलेनो जप्त, ६.५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

 

नागपूर-भंडारा महामार्गावरून अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला वडोदा पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ५५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

२७ मे २०२६ रोजी वडोदा पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, नागपूर ते भंडारा हायवेने एका लाल रंगाच्या ‘बलेनो’ कारमधून अवैध देशी दारूची तस्करी केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी उमरी फाटा येथे तातडीने नाकाबंदी केली.

मुद्देमाल जप्त

नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाटणारी बलेनो कार (क्र. MH 43 BN 4452) थांबवून पंचांसमक्ष तपासणी केली असता, त्यात देशी दारूच्या १४ पेट्या (एकूण १३८८ निपा) आढळून आल्या. पोलिसांनी ५५,५२० रुपये किमतीची दारू आणि ६ लाख रुपये किमतीची कार, असा एकूण ६,५५,५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपीला अटक

या प्रकरणी पोलिसांनी निलेश चंदनलालजी जयस्वाल (वय ५२ वर्षे, रा. वैशाली नगर, नागपूर) याला ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध वडोदा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास वडोदा चे पोलीस निरीक्षक करीत आहेत.

नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *