तरुणाने घराच्या छताला घेतला गळफास

तरुणाने घराच्या छताला घेतला गळफास

कामठी

नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील गादा गावातील तरुणाने घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. घटना शुक्रवारी सायंकाळी ७ दरम्यान निदर्शनास आली. अश्विन संजय भोयर (वय २८, रा. रविदास नगर कामठी तरुणाचे नाव असे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अश्विनचे आई

वडील कामावर गेले होते. घरात तो एकटाच होता. सायंकाळी आई वडील कामाहून घरी परतल्यावर घटना उघडकीस आली. दृष्य बधताचा आईवडिलींनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून पंचनामा केली. मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे रवाना करण्यात आले . आकस्मिक मृत्यूची नोंद केली. आत्महत्येचे कारण कळले नाही. अश्विन विवाहित होता. ते भारतीय भोई विकास मंडळाचे अध्यक्ष मनोहर भोयर यांचे पुतणे होते.

कामठी तालुका प्रतिनिधी – दिलीप मेश्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *