मौदा तालुक्यात ‘शाळा बंद’ आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद; १००% शिक्षक आंदोलनात सहभागी!
9/7/2026 चे शिक्षकांचा सामूहिक रजा..!!
मौदा:
राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला मौदा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यातील १०० टक्के खासगी अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या विविध न्याय्य मागण्यांसाठी शिक्षकांनी सामूहिक रजेचे हत्यार उपसले असून शाळांना कुलूप ठोकले आह
शाळेच्या चाव्या प्रशासनाकडे सुपूर्द: सर्व शिक्षक रजेवर गेल्यामुळे मुख्याध्यापकांनी शाळांच्या चाव्या ‘शाळा व्यवस्थापन समिती’ अध्यक्षांकडे सोपवल्या आहेत.
प्रशासकीय कामकाजावर परिणाम: शंभर टक्के शिक्षकांनी रजेचा अर्ज दिल्याने शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
प्रशिक्षणावर बहिष्कार: सध्या सुरू असलेल्या तालुकास्तरीय पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षणातही शिक्षकांनी सहभागी न होता आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला आहे.
तालुका शिक्षक कृती समितीच्या वतीने माननीय गटशिक्षणाधिकारी श्री. संकेत मरस्कोल्हे आणि शिक्षण विस्तार अधिकारी सौ. ललिता चामट यांना संयुक्त निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी आपल्या मागण्यांबाबत ठाम निर्धार व्यक्त केला.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा कृती समिती समन्वयक श्री. जुगलकिशोर बोरकर, तालुका अध्यक्ष श्री. रवींद्र चावट, शिक्षक सेनेचे श्री. गजानन बेले, अखिल भारतीय शिक्षक संघाचे श्री. अशोक हटवार, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. सुकराम रामटेके, केंद्रप्रमुख श्री. राजू आंबीलकर आणि जनता शिक्षक महासंघाचे तालुका कार्याध्यक्ष श्री. हेमराज वैद्य यांनी केले. याप्रसंगी पुरोगामी शिक्षक संघटनेचे श्री. भिवगडे यांच्यासह तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले असून, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”
— तालुका शिक्षक कृती समिती, मौदा.
नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
