जलालखेडा पोलिसांची मोठी कारवाई! 94 लाख 8 हजारांचा सुगंधी तंबाखूचा कंटेनर जप्त

जलालखेडा पोलिसांची मोठी कारवाई! 94 लाख 8 हजारांचा सुगंधी तंबाखूचा कंटेनर जप्त

जलालखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेली धडक कारवाई. मध्यप्रदेशातून सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारा कंटेनर पोलिसांनी पकडला असून तब्बल 94 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

जलालखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नियमित तपासणीदरम्यान पोलिसांनी संशयित कंटेनर अडवला. चौकशीदरम्यान चालकाने कंटेनरमध्ये फॉर्च्यून खाद्यतेल असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

मात्र पोलिसांनी कंटेनरची सखोल तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी चालकाला तात्काळ अटक केली.

या कारवाईत कंटेनरसह एकूण 94 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश बाभुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या कारवाईमुळे अवैध सुगंधी तंबाखू वाहतुकीला मोठा आळा बसण्याची शक्यता जे प्रकाश बांबुलकर यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिनिधी arvindra Madane काटोल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *