महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन ( मेसा ) संघटनेच्या विविध मागण्या मान्य नाही झाल्या तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे*
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन (मेसा) संघटनेच्या विविध मागण्या बाबत चे निवेदन शिक्षण उपसंचालक कैलास दातखिळ , शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) आश्विणी लाटकर व शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) जयश्री चव्हाण यांना मेसा संघटनेचे शिष्टमंडळ नी प्रत्यक्ष भेट देऊन खालील मागण्याचे निवेदन देण्यात आले आहेत व या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा शिक्षण विभागाच्या कार्यालय समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे
१) आज सध्या स्थितीत बहुतेक खाजगी प्री- स्कूल हे केवळ आणि केवळ व्यावसायिक
तत्त्वावर, नफेखोरी साठी चालवले जात आहेत. अनेक ठिकाणी कोंदट खोल्या, पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची कोणतीही हमी नाही. नवीन शैक्षणिक धोरण-२०२० (N.E.P.) च्या धोरणानुसार व आरटीई -२००९
ॲक्ट च्या कायद्यानुसार शासनमान्य प्राथमिक शाळांना जोडणे बंधनकारक आहे. जेणेकरून त्यांच्यावर सरकारी देखरेख राहील. बहुतेक, खाजगी प्री- स्कूल या पालकांकडून हजारो रुपये फी उकळणाऱ्या या संस्थांना ना कायद्याचे भय आहे, ना प्रशासनाचा धाक, संलग्नीकरन रखडल्या मुळें या बालवाड्या मध्ये नक्की कोणता अभ्यासक्रम शिकवला जातो, तेथील कर्मचारी पात्र आहेत की नाही, याची कोणतीही तपासणी होत नाही
म्हणून प्रि- प्रायमरी स्कूल संलग्नीकरणाचा आदेश कागदावरच न ठेवता शासनमान्य
प्रायमरी स्कूल ला या प्रि-स्कूल जोडण्यात याव्यात व या सर्व खाजगी प्रि- स्कूल शोधून
तात्काळ बंद करण्यात याव्यात. जेणेकरून, छ. संभाजीनगर मध्ये नुकत्याच प्रि- .प्रायमरीम स्कूल मध्ये जी दुर्दैवी घटना घडली, त्याची पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही, याची शिक्षण विभागाने काळजी
घ्यावी.
२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार
शाळांमधील राखीव २५% जागेवरील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची प्रतिपूर्ती न
झाल्याने शाळांमार्फत मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यात मा. उच्च न्यायालयाने आदेश पारित केले आहेत की, ४ आठवड्यां च्या आत संबंधित
शाळांची आरटीई प्रतिपूर्ती रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी.
३) गेल्या १० वर्षांपासून आर टीई प्रतिपूर्ती रक्कम रु. १७६७०/- प्रति विद्यार्थी आहे, त्यामध्ये या महागाईच्या काळात शासनाने कोणतीही वाढ केलेली नाही. तरी ती वाढवून रु. ३५,०००/- प्रति विद्यार्थी करावी. अन्यथा मा. उच्च न्यायालयास याचिका दाखल
करण्यात येईल.
४) महाराष्ट्रात आर टीई प्रतिपूर्ती रक्कम रु. २९०० कोटी रुपये रक्कम थकित आहे व छ. संभाजीनगर संपूर्ण जिल्ह्याची आर टीई प्रतिपूर्ती रक्कम रु. १५० कोटी रक्कम थकीत आहे, ती तात्काळ इंग्रजी शाळांच्या बँक खात्यात ऑनलाईन प्रणालीद्वारे जमा करावी.
५) जिल्ह्यात व तालुक्यात प्रि-प्रायमरी शाळेच्या नावाने इयत्ता १ ली ते ३ री चे वर्ग अनाधिकृत रित्या चालवल्या जात आहेत, याकडे शिक्षण विभागाने तपासणी करून अनधिकृत इंग्रजी शाळा तात्काळ बंद करावे जेणेकरून
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
६) जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये अनाधिकृत शाळांचा सुळसुळाट दिसून येत आहे.अनाधिकृत शाळा छ. संभाजीनगर मध्ये मोठ्या प्रमाणात फोफावल्या आहेत. अशा शाळांची तपासणी करून अनाधिकृत घोषित कराव्यात.
७) नवीन शाळांना मान्यता देताना शासनाने पूर्वी कार्यान्वित असलेल्या शाळांच्या बाजूला नवीन शाळांना मान्यता देण्यात येऊ नये. शहरातील किंवा गावातील लोकसंख्येनुसार व मागणीनुसार नवीन शाळेस मान्यता द्यावी व तात्काळ बृहत अराखडा ( मास्टर प्लॅन ) लागू करावा .
८) अनाधिकृत स्थलांतर व हस्तांतर शाळांची चौकशी करून त्या अनाधिकृत स्थलांतरीत झाल्या असेल तर अशा अनधिकृत स्थलांतरीत शाळा तात्काळ बंद करण्यात याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मेसा संघटने मार्फत देण्यात आला आहे व तीव्र उपोक्षण करण्याचा इशारा दिला आहे .
९) ऑनलाईन प्रणालीच्या नावाखाली इंग्रजी शाळांच्या संस्थाचालकांना व मुख्याध्यापकांना पुन्हा पुन्हा हार्ड कॉपी जमा करायला लावून व ऑनलाईनचे जास्तीचे काम लावून व नेहमी नेहमी शाळेचे कागदपत्रे जमा करण्यास भाग पाडले जातात, तरी शाळांचे शिक्षण विभागाकडे कागदांची संचिका जमा आहे, तरी ते परत मागविण्यात येऊ नये.
वरील इंग्रजी शाळांच्या मागण्यां तात्काळ मान्य झाल्या नाही तर शिक्षण विभाग च्या कार्यालय समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे व उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे .
या वेळी मेसा संघटनेचे निवेदन देतांना राज्य अध्यक्ष प्रा . प्रविण आव्हाळे , राज्य सरचिटणीस संदीप लघाने पाटील , जिल्हा अध्यक्ष प्रा . अक्षय न्यायाधीक्ष , जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद जाधव , गंगापूर तालुका अध्यक्ष अन्ना चव्हाण , मुजाहीब शेख , खुलताबाद तालुका अध्यक्ष सादोद्दीन शेख , रमेश प्रधान , विनोद शिंदे , शरद गुंड , रवि दाभाडे , सचिन मुसाळे , संदिप दुधाळ आदी मेसा संघटनेचे शिष्ठ मंडळ उपस्थित होते .
