🏫 नरसिंग कन्या कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावीच्या विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली
अकोला (प्रतिनिधी): सरस्वती महाविद्यालय येथील बारावीची विद्यार्थिनी ईश्वरी देवेंद्र पूनकर हिला आज रसायनशास्त्राचा पेपर लिहित असताना अचानक चक्कर येऊन अस्वस्थ वाटू लागले. परीक्षा सुरू असताना प्रकृती बिघडल्यामुळे काही वेळासाठी परीक्षा कक्षात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच केंद्रावरील शिक्षिका शारदा ढोणे मॅडम यांनी तत्काळ पुढाकार घेत विद्यार्थिनीला आवश्यक ती मदत केली. तिला पाणी देऊन विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली तसेच तिच्या कुटुंबियांना त्वरित संपर्क करून परिस्थितीची माहिती देण्यात आली.
शारदा ढोणे मॅडम यांच्या तत्परतेमुळे विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात आली. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत आवश्यक ती सर्व काळजी घेतली असल्याचे सांगितले.
या घटनेतून परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे
आहे हे पुन्हा अधोरेखित झाले असून, शिक्षिकेच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्य विदर्भ उपाध्यक्ष व सिटी इंडिया मराठी न्यूज उपसंपादक प्रतिनिधी अकोला देवेंद्र पुनकर सावरा सिटी इंडिया मराठी न्यूज अमरावती जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खेडकर
