*पवनी वनपरिक्षेत्रात वाहन धडकेने ठार झालेल्या नर बिबट्याचा मानकानुसार वन विकास महामंडळाने केला अंत्यविधी*
नागपूर, दि.२८:- नागपूर – जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर एफडीसीएम अंतर्गत पवनी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. ४२० जवळ दिनांक २७ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास एक नर बिबट चा जोरदार वाहनाने धडक दिल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पवनी वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली.
मृत बिबट्याचे वय अंदाजे दोन ते तीन वर्ष असून त्याच्या शरिरावर भरधाव वाहनाच्या जोराने धडकेमुळे जखमा दिसून आल्या.
दि. 28 रोजी पवनी विक्री आगार येथे सदर बिबट्यावर शासन निर्देशाप्रमाणे अंत्यविधी करण्यात आला. मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी मंदार पिंगळे, गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.श्री.सुजित कोलंघाथ, वन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक उत्तम सावंत, विभागीय व्यवस्थापक ए आर घाटेकर, वन परिक्षेत्र अधिकारी गजानन केंद्रे, गौरव पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते.
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
