प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक उघड; केळवद पोलिसांनी ६.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक उघड; केळवद पोलिसांनी ६.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

केळवद महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला केळवद पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे ₹६ लाख ६८ हजार १२५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. २६ जुलै २०२६ रोजी केळवद पोलीस पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारे मौजा खुर्सीपार शिवारातील पांढुर्णा–नागपूर महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी संशयित महिंद्रा एक्सयूव्ही ५०० वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू आढळून आला.

या प्रकरणी आकाश श्रीकृष्ण भुते (वय २६), रा. तिनखेडा, ता. सौसर, जि. पांढुर्णा (म.प्र.) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून ७१.२८ किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, महिंद्रा एक्सयूव्ही ५०० वाहन आणि एक मोबाईल असा एकूण ₹६,६८,१२५ किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमांनुसार केळवद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

केळवद पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *