20 गोवंश जनावरांची सुटका
मौदा पोलीसांची कारवाही
नागपुर:- दिनांक 20 /2/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान उपविभागातील पोलीस स्टेशन मौदा परिसरात अवैध धंद्यावर कारवाई करणे करिता पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारा कडून प्रकाश बोरकर राहणार (खराडा पुनर्वसन) मारोडी, मौदा. याने आयशर वाहनात कत्तली कामी गोवंश जनावरे भरली असून ते वाहन मौदा मार्गे नागपूरच्या दिशेने निघाले आहे. अशी माहिती मौदा पोलिसांना मिळताच मारवाडी पुलाजवळ नाकाबंदी केली असता एक संसहित आयशर वाहन त्यांच्या दिशेने येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवण्याच इशारा केला असता पोलिसांना पाहून सदर वाहन चालकाने त्याचे वाहन न थांबवता माथनीटोल नाक्याकडे पळविले. पोलिसांनी वाहनाच पाठलाग केला असता वाहन चालकाने भरधाव वेगाने वाहन चालविल्याने गुमथळा पुला कळून कामठी कडे वळवीत असताना वाहन पलटी झाले. त्यानंतर वाहन चालक वाहन सोडून पळून गेला असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर माहिती ही श्री. संतोष गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देऊन मौदा पोलिसांना घटनास्थळी बोलावले. पोलिसांनी पंचा समक्ष आयशर क्रमांक एम एच 40 सीडी 34 69 या वाहनाची तपासणी केली असता यामध्ये 20 गोवंश जनावरांना कोणतीही चारा पाण्याची सोय न करता, अत्यंत कमी जागेत दाटीवाटीने कोंबून निर्दयतेने शिंगाला व पायाला आखूड दोरखंडाने बांधून वाहतूक करीत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी पंचा समक्ष घटनास्थळावरून आयशर ट्रक क्रमांक एम एच 40 सीडी 34 69 अंदाजे किंमत 15 लाख रुपये, आणि वीस गोवंश जनावरे किंमत दोन लाख रुपये असा एकूण किंमत 17 लाख रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वीस गोवंश जनावरांना गोविज्ञान अनुसंधान गौशाळा खरबी तालुका जिल्हा भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे
पोलीस स्टेशन मौदा येथे आरोपी प्रकाश बोरकर राहणार (खराडा पुनर्वसन) मारोडी, मौदा आणि आईसर ट्रक क्रमांक एम एच 40 सीडी 34 69 च्या चालकाविरुद्ध कलम 11 (1) (अ) (ड) (फ) प्रा . छ . प्र. अधी,,5(1)(2),9प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम 281,भान्यास.सह कलम 184 म पो का, सहकलम 239,177 मो वा का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास मौदा पोलिस निरीक्षक सरीन दुर्गे करीत आहेत.
नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
