आमदार आशिष देशमुखांकडून ६० लाखांचा निधी मंजूर मोहपा येथील ऐतिहासिक बन्सोड उद्यानाचा होणार कायापालट
कळमेश्वर तालुक्यातील मोहपा शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या ऐतिहासिक गुरुवर्य किसन फागुजी बन्सोड उद्यानाचा लवकरच कायापालट होणार आहे सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष बाबू देशमुख यांनी या उद्यानाच्या विकासासाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सिटी इंडिया न्यूजने या उद्यानाच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रसारित केले होते
या बातमीची तत्काळ दखल घेत आमदारांनी विकासाचा हा मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे यामुळे उद्यानाला पुन्हा नवसंजीवनी मिळणार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे या विकासकार्यामुळे दलितोद्धारक गुरुवर्य किसन फागुजी बन्सोड यांचा गौरवशाली वारसा जतन करण्यास मोठी मदत होणार असून मोहपा शहराच्या सौंदर्यातही यामुळे मोलाची भर पडणार आहे सिटी इंडिया न्यूजचा यशस्वी पाठपुरावा आणि लोकप्रतिनिधींची कार्यतत्परता यामुळे मोहपा परिसरात सध्या आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी आमदारांचे आभार मानले आहेत
विशेष प्रतिनिधी चंदू मडावी
