सावळदबारा येथील चक्रधर स्वामी मंदिरासाठी अडीच कोटींची विकासकामे मंजूर; इद्रिस मुलतानी यांच्या पाठपुराव्याला यश

सावळदबारा येथील चक्रधर स्वामी मंदिरासाठी अडीच कोटींची विकासकामे मंजूर; इद्रिस मुलतानी यांच्या पाठपुराव्याला यश

सभागृह, रस्ता, स्वच्छतागृह, प्रसाद व्यवस्था, संरक्षण भिंत व पथदिव्यांसाठी निधी

 

 

सोयगाव तालुका प्रतिनिधी संतोष गर्दे

 

 

 

 

: सावळदबारा येथील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या चक्रधर स्वामी मंदिराच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे २ कोटी ४५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री ना. अतुलजी सावे तसेच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या सहकार्याने ही कामे मंजूर झाली असून, यासाठी इद्रिस मुलतानी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

 

चक्रधर स्वामी मंदिराला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी इद्रिस मुलतानी यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळून मंदिराला ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांसाठी त्यांनी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला.

 

मंदिराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या निधीतून सभागृह बांधकामासाठी १ कोटी रुपये, तर रस्ता, स्वच्छतागृह व प्रसाद व्यवस्थेसाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी ५० लाख रुपये आणि पथदिव्यांसाठी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

 

या विकासकामांमुळे मंदिर परिसरातील भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. सभागृह, रस्ते, स्वच्छतागृह, प्रसाद व्यवस्था, संरक्षण भिंत आणि पथदिवे यामुळे मंदिर परिसराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. तसेच मंदिराच्या विकासामुळे सावळदबारा परिसरातील धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

 

फर्दापूर जिल्हा परिषद गटातील या महत्त्वपूर्ण विकासकामांसाठी इद्रिस मुलतानी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, ना. जयकुमार गोरे, ना. अतुलजी सावे आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे विकासकामांना मोठी चालना मिळाली आहे.

 

फर्दापूर जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी शासनाकडून मंजूर झालेला हा निधी धार्मिक स्थळांच्या विकासासोबतच मूलभूत सुविधा आणि पायाभूत सुविधांना बळकटी देणारा ठरणार आहे. परिसरातील विकासकामांसाठी पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे इद्रिस मुलतानी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *