हिवरा(संगम) येथे भव्य (बैलगाडा) शर्यतीचे आयोजन: 3 लाख 50.000 रुपयांच्या बक्षिसांची होणार उधळण!
महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्व.धोंडीरावजी कदम पाटील,स्व.दादाराव रंभाजी कदम,स्व. ब्रिजलाल जयस्वाल यांचे स्मृती पित्यर्थ भव्य विदर्भ हिंदकेसरी शंकरपट (बैलगाडा) शर्यतीचे आयोजन शनिवार दि.२८फेब्रुवारी २०२६ ते सोमवार दि.२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान येथील डॉ. राम कदम यांच्या गावाशेजारील शेतामध्ये करण्यात आले असून या स्पर्धेत लाखो रुपयांची उधळण होणार असून जनरल’ गट व क’ गट असे दोन गटात ही स्पर्धा होणार असून अ गटामध्ये प्रथम बक्षीस ७१००० , दुसरे बक्षीस ५१०००, तिसरे बक्षीस ३१०००, चौथे बक्षीस १५०००, पाचवे बक्षीस ११०००, यासह अन्य आठ बक्षिसे ठेवण्यात आले तर क गटामध्ये प्रथम बक्षीस ३१०००, दुसरे बक्षीस २१००० तिसरे बक्षीस ११०००, चौथे बक्षीस ९०००, पाचवे बक्षीस ७०००, यासह अन्य आठ बक्षिसे ठेवण्यात आले असून एकूण ३० बक्षीसे देण्यात येणार आहे या स्पर्धेत साडेतीन लाख रुपयांची उधळण होणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन डॉ.राम कदम (माहूरगड) यांच्या शुभहस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद पांडे (माजी मुख्याध्यापक) योगेश वाजपेयी फुलसावंगी, महागाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री अमोल चिकने,सरपंच डॉ. धोंडेरावजी बोरुळकर (माजी सरपंच) प्रवीण जामकर (माजी सरपंच) सतीश पाटील ठाकरे, आनंदरावजी कदम, श्रीराम महादजी कदम, अशोकभाऊ जयस्वाल, ज्येष्ठ पत्रकार विजयराव बोंबीलवार, व्यापार संघटनेचे अध्यक्ष शफी शेट सूरर्या, राजू खोंडे, पत्रकार भगवानराव फाळके, महेश कामारकर,अनिल बोंपीलवार, बिहारी जयस्वाल, संदीप कदम, एस. के शब्बीर.गजानन कदम, ज्येष्ठ नागरिक माधवराव कदम, बाबुरावजी कदम मा.चेअरमन, अन्वरभैया चव्हाण या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सोमवार दि.२फेब्रुवारीला ५ वाजे दरम्यान प्रमुख पाहुणे नितीनभाऊ भुतडा (भाजपा यवतमाळ जिल्हा समन्वयक) उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे, भाजप नेते दिपकराव आडे, वानखेडे साहेब किनगाव राजा ,अशोकराव पाटील घारपळकर प्रमुख उपस्थिती शिवाजीराव सवनेकर, डॉ.अरुण पाटील,यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणारा असून ही स्पर्धा शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडणार असून मोक्षधाम सेवा समिती, शिवशक्ती स्पोर्टिंग क्लब, जाणता राजा क्रिकेट क्लब, साहेबराव पाटील मित्र मंडळ यांचे सहकार्य असणार आहे पंचकोशीतील शंकरपट शौकिकांनी याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त बैलगाडा शर्यतीचे शौकीन बैल मालकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ शंकर पट (बैलगाडा) संघटनेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील कदम, पंजाबराव पाटील कदम यांनी केले आहे. Ct india News जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ
