जवाहर नगर पोलिसांची मोह फुलाच्या हातभट्टी दारूवर रेड…..!!

जवाहर नगर पोलिसांची मोह फुलाच्या हातभट्टी दारूवर रेड…..!!

 

भंडारा: पोलीस स्टेशन जवाहर नगर अंतर्गत आरोपी नामे जयपाल बालक दास बागळे वय 50 वर्ष राहणार उमरी, तालुका जिल्हा भंडारा, अशोक नगर तालुका जिल्हा भंडारा, यातील फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक दूधकावरा यांना गुप्त माहिती वरून रेड केली असता नमूद आरोपी मौजा अशोक नगर, मूजबी नाल्याचे किनारी मिळून आल्याने यातील आरोपीचे ताब्यातून एकूण 42 नग प्लास्टिक चुंगळीत प्रत्येकी 30 किलो प्रमाणे 1260 किलो सडवा मोहफास प्रत्येकी दोनशे रुपये किलो प्रमाणे एकूण 2,52,000/- रुपयांच्या मुद्देमाल मिळून आल्याने अप.क्रमांक. 96/ 2026 कलम 65 (फ) महाराष्ट्र दारू बंदी कायदा अन्वये आरोपी नामे जयपाल बालकदास बागडे यांचे विरुद्ध जवाहरनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील साहेब, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दूधकावरा, पोलीस हवालदार नागरीकर, यांनी केली असून पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहे…

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *