करडी पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर कारवाई…!! एकूण 30 लाख 24 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त

करडी पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर कारवाई…!!

एकूण 30 लाख 24 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त….!!

 

भंडारा:- पोलीस स्टेशन करडी अंतर्गत आरोपी नामे प्रकाश रूपचंद नेरकर वय 37 वर्ष, जात माळी रा.बेटाळा, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा, यातील फिर्यादी पो.शी. तांगडे हे दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी पेट्रोलिंग करत असताना मौजा नीलज बूज गावात जाणारा फाटा येथे, यातील नमूद आरोपी हा त्याचे ताब्यातील एक टाटा कंपनीचा एमएच 34 ए बी. 4227 टिप्पर अवैधरित्या विना पास पास परवाना अंदाजे 04 ब्रास रेती भरून देव्हाडा बुज कडून करडी कडे जात असताना टीप्पर बेदरकारपणे व हयगयीने चालवून अपघात केल्याने व विना पास परवाना रेती वाहतूक करताना मिळून आल्याने व त्याचे ताब्यातून एक टाटा कंपनीचा एम एच 34 ए बी. 4227 टिप्पर किंमत तीस लाख रुपये, व अंदाजे 04 ब्रास किंमत24000/-रुपये असा एकूण 30,24000/- हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला. अभी अवैध धंदे का सफाई किया जायेंगा असे गव्हाई कर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागलोत यांनी दिली. अब अवैध धंदे वालों की कोई खैर नही, व आरोपी विरुद्ध करडी पोलीस स्टेशन येथे अप क्रमांक 56/2026 कलम 281,303(2) बी.एन.एस कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक भंडारा श्री नूरुल हसन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नागलोत साहेब, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक फरताडे साहेब, पोलीस शिपाई तांगडे, पोलीस स्टेशन करडी यांनी केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन करडीचे अधिकारी करीत आहेत.

 

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *