सिहोरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती वाहतूक सुरूच….!! एकूण 12,60,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.

सिहोरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती वाहतूक सुरूच….!!

एकूण 12,60,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त….!!

 

भंडारा:- दि.28 फेब्रुवारी रोजी सिहोरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करीत असताना मौजा गोंदेखारी पेट्रोल पंप समोर गोपनीय माहिती मिळाली की तो ट्रक थांबवून ट्रकची पाहणी केली असता त्या ट्रकमध्ये अवैध रेती वाहतूक असल्याचे मिळाले, रेतीबाबत वाहतुकीच्या परवाना विचारले असता त्यांच्याकडे कसल्याही प्रकारच्या नाही. ट्रक चालक आरोपी श्री.मोहसिन सिराजउद्दीन शेख वय 35 वर्ष राहणार अलीलाल कॉलनी (नागपूर गेट)अमरावती, आरोपी यांच्या ताब्यातील एक पिवळ्या रंगाच्या एलपी ट्रक क्रमांक MH 12 LT -3764 किंमत बारा लाख रुपये व त्यामध्ये किंमत 60000/- रुपये, असा एकूण 12,60,000/ -रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, आरोपी चालकास अवैध रेती वाहतूक की बाबत परवाना विचारले असता आरोपीने कसल्याही प्रकारच्या परवाना नसल्याचे सांगितले, अवैध रित्या वाहतूक करताना त्याचे ताब्यातून एक पिवळ्या रंगाच्या एलपी ट्रक क्रमांक एम एच 12 LT 3764 किंमत बारा लाख रुपयेचा मुद्देमाल मिळून आल्याने फिर्यादीचे लेखी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अप.क्रमांक 80/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये सिहोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरुल हसन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक भंडारा श्री. निलेश मोरे साहेब, पोलीस निरीक्षक श्री.कसोधन साहेब सिहोरा, यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गयगये, पोलीस स्टेशन सिहोरा यांनी केली असून पुढील तपास शिओरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *