नगर पंचायत अध्यक्षांना जामा मस्जिद महागांव कमिटी कडून सभागृहसाठी हाख
महागाव शहरात मुस्लिम समाजाची 250 ते 300 घरे असून मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमासाठी कोणती व्यवस्था व सभागृह नसल्यामुळे शासनाच्या निधीपासून मुस्लिम समाज वंचित दिनांक 9 मार्च 2026 रोजी जुने गाव महागावच्या जामा मज्जिद च्या कमिटीच्या कार्यकर्त्यांनी महागाव नगरपंचायत च्या नगराध्यक्षांना दिले निवेदन या निवेदनात प्रभाग क्रमांक १६ मधील मुस्लिम वसाहतीतील सामाजिक सभागृह आणि त्यालगतची खुली जागा ही मौलाना अबुदुल कलाम आझाद बहुउद्देशीय शिक्षण संस्था, महागाव यांना हस्तांतरण करण्याची मागणी केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १४ मार्च २०२२ रोजी नगर पंचायतच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव क्रमांक ३२ पारित करण्यात आला होता.
या ठरावानुसार मुस्लिम वसाहतीतील सामाजिक सभागृह आणि नगर पंचायतची ओपनस्पेसची जागा ही मौलाना अबुदुल कलाम आझाद बहुउद्देशीय शिक्षण संस्था, नोंदणी क्रमांक ७५४/२०१५ यांना देखरेख, सौंदर्यीकरण आणि वापरासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र हा ठराव पारित होऊन सुमारे चार वर्षांचा कालावधी उलटून गेली तरीही नगर पंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तर आता याकडे नगरपंचायत मुख्य अधिकारी आणि उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्राचे आमदार किसनराव वानखेडे साहेब यांनी लक्ष देऊन मुस्लिम वसाह सामाजिक सभागृहाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी जोर धरत आहे.
प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ
